जळगाव (प्रतिनिधी) वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांची आज कार्तिकी एकादशी जयंती संस्था व सहयोगी संस्थांच्या वतीने ७५१ जयंती समाजाचे शिंपी समाज, मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालय येथे असलेल्या संत नामदेव महाराजांच्या मंदिरात साजरी करण्यात आली.
समाज अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्था उपाध्यक्ष विवेक जगताप सचिव चंद्रकांत जगताप, चेतन खैरनार, सुरेश सोनवणे, किशोर निकम, रामकृष्ण शिंपी शरद बिरारी, हेमंत शिंपी, कमलेश शिंपी, गणेश सोनवणे संजय गवांदे, अनील खैरनार, शैलेंद्र कुमार सोनवणे, प्रशांत कापुरे, दत्तात्रय वारुले, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.