धरणगाव (प्रतिनिधी) आज दि. २६ जानेवारी २०२१ मंगळवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल शाळेतील एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत शाळेतुन व मागासवर्गीयांतुन प्रथम आलेली विद्यार्थीनी श्रद्धा ज्ञानेश्वर पाटील हिच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेतील क्रिडाशिक्षक हेमंत माळी यांनी भारताचे संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन शाळेचे उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे. एस. पवार, सर्व शिक्षक बंधु – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सर्व सन्माननीय संचालक मंडळ सुकदेव महाजन, गोपाल महाजन, मधुकर रोकडे, शाळेचे माजी मुख्याध्यापक एस. डब्ल्यु. पाटील, एम. के. महाजन, व्ही. पी. महाले, वाय. डी. महाजन, नुतन प्राथमिक विद्यामंदीरचे मुख्याध्यापक अतुल सुर्यवंशी, शिक्षकवृंद जगन्नाथ महाजन, निलेश रावा माळी, नितेश महाजन, निलेश पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, पालक बंधु – भगिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.