धरणगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती सकल मराठा समाजाच्या वतीने दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरी करण्यात आली. संत तुकारामांचे अभंग जगाला प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रभारी नगराध्यक्षा कल्पना विलास महाजन व विलास महाजन यांच्या हस्ते तुकाराम महाराजांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे, भाजपचे शिरीष बयस, ॲड. संजय महाजन, वसंतराव भोलाने कमलेश तिवारी, नगरसेवक गुलाब मराठे, पत्रकार कडू महाजन, रवी महाजन, भरत चौधरी, आर डी महाजन, बि आर माळी, जितेंद्र महाजन, राजेंद्र वाघ, कल्पेश महाजन, दिपक चौधरी, नितीन चौधरी दिपक वाघमारे, निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी, शिवसेनेचे नगरसेवक भागवत चौधरी, बुटा पाटील, बंटी महाजन, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, सकल मराठा समाजाचे चंदन पाटील, गोपाल पाटील, नामदेव मराठे, भीमराज पाटील, वाल्मीक पाटील, लक्ष्मण पाटील, राहुल मराठे, समाधान पाटील, जितेंद्र पाटील, सुनील चौधरी, दिनेश भदाणे, मोहित पाटील, विक्रम पाटील, रवी पाटील, किरण वऱ्हाडे, हर्शल चव्हाण, विकास लांबोडे, पवन महाजन आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक मंगेश पाटील व आभार गोपाल पाटील यांनी मानले.