TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोटे दस्तावेज सादर करीत धरणगाव तहसीलमधून मिळविले जात प्रमाणपत्र ; माहिती अधिकार कार्यकर्ते कांडेलकर यांचा गंभीर आरोप !

चौकशी समिती नावाला ; महिना उलटूनही अहवाल नाही : संजय कांडेलकर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2022
in एरंडोल, जळगाव, जिल्हा प्रशासन, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे त्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे दुय्यम अधिकारी चौकशी कशी करतील?, असा सवाल मुख्य तक्रारकर्ते श्री.कांडेलकर यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे नेमकी तक्रार 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतच्या अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागी विद्यमान सदस्य अशोक शालिग्राम भोलाणकर यांनी खोटे दस्तावेज सादर करून धरणगाव तहसील कार्यालयाकडून मिळविलेल्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळविल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संजय संतोष कांडेलकर (रा.राजुरा, ता.मुक्ताईनगर) यांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. ७ जून २०२२ रोजी केली होती. धरणगावचे तहसीलदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता न तपासता प्रकरण मंजूर करून उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे पाठविले. त्यांनतर उपविभागीय कार्यालयात सुद्धा कागदपत्रांची खातरजमा न करताच जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले. धरणगाव तहसीलदार आणि एरंडोल उपविभागीय अधिकारी यांनी यात मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप कांडेलकर यांनी केला आहे.

 

चौकशी समितीची नियुक्ती

याबाबत चौकशीसाठी दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांनी जात प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमून एका महिन्यात चौकशी संपवून त्याचा अहवाल तहसिलदार धरणगाव यांच्याकडे सुपूर्द करावा. तसेच सदर अहवाल तपासून तहसीलदार यांनी तो उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा, असा स्पष्ट आदेश दिला. या समितीत निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पाळधी मंडळ अधिकारी आणि बांभोरी प्र.चा येथील तलाठी यांचा समावेश आहे. परंतू महिना उलटून देखील अद्याप याप्रकरणी समितीने चौकशी केली नसल्याचे समोर आले आहे.

 

मुद्दाम दिरंगाई केली जातेय  

याबाबत अनेक दिवसापासून लढा देत आहे. १९४६ चे चुकीचे संदर्भ असूनही स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जातीचा दाखला दिला आहे. याबाबत तक्रार करूनही न्याय मिळण्यास मुद्दाम दिरंगाई केली जातेय. न्याय न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागेल. परंतू मुळात प्रश्न असा आहे की, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे ज्युनिअर अधिकारी काय चौकशी करणार ?. म्हणूनच महिना उलटूनही अहवाल दिला जात नाहीय. पण याबाबतचा लढा शेवटपर्यंत सुरु राहील.

– संजय कांडेलकर (मुख्य तक्रारदार)

 

आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी दुय्यम अधिकारी कसे करणार?  

धरणगाव तहसील कार्यालयाकडून गंभीर चुका काही प्रकरणात झालेल्या आहेत. काही प्रकरणांची तर माहिती देखील कार्यालयात उपलब्ध नाही. गेल्या वर्ष भरापासून याकामी पाठपुरावा सुरू आहे. मात्र तहसील कार्यालयाकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही. खोटे कागदपत्रं द्वारे जात प्रमाणपत्र मिळविण्याचे काही प्रकार मागील काळात झाले आहेत. काही अधिकाऱ्यांनी डोळे झाकून कनिष्ठ कार्यालयातून प्राप्त प्रकरण हतळल्याचे स्पष्ट होते.

– जितेंद्र महाजन (संघटक, उत्तर महाराष्ट्र, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ)

 

दरम्यान, याबाबत धरणगाव तहसीलदार यांना व्हाटस्अपवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी बातमी अपडेट होईपर्यंत उत्तर दिलेले नव्हते. तर प्रांत अधिकारी यांचा फोन सतत व्यस्त येत होता. दोघांकडून संपर्क झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया अपडेट करण्यात येईल.     

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

April 30, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 एप्रिल 2026 !

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 एप्रिल 2026 !

April 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

April 27, 2026
Next Post

रोझलँड इंग्लिश मिडीयममध्ये रेड कलर डे साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भाजपची 99 जणांची पहिली यादी जाहीर, जळगाव जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश !

October 20, 2024

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा : न्या. ए. ए. शेख

July 19, 2022

जळगाव बस स्थानकातून विवाहितेची मंगलपोत लांबविली ; दोन अल्पवयीन मुलं ताब्यात !

November 18, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

April 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group