चाळीसगाव (प्रतिनिधी) जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप सोलर कंपनीत घातक हत्यारानिशी कट कारस्थान करुन दरोडा घालण्याच्या उद्देशाने अनाधिकृत प्रवेश करुन कंपनीची भिंतीवर दगड ढकलुन आत प्रवेशकरुन दरोडा घालल्या प्रकरणी तब्बल ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात कैलास विठ्ठलराव घुगे (वय ३०, असि. मॅनेजर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ११ ऑक्टोंबर रोजी भिमराव बुधा जाधव (रा. बोढरे) व भरत पाडुरंग चव्हाण (रा. चाळीसगाव) यांनी चिथावणी देऊन महिला-पुरुषांना सोबत मिळून कटकारस्थान करुन आंदोलनाचा बहाणा करुन जेबीएम सोलर कंपनीची ब्लॉक नं. ०७ ची भिंत मोठा दगड ढकलुन तोडून दोडा घालण्याचे उद्देशाने आत हत्यारानिशी अनधिकृत प्रवेश प्रवेश केला. तसेच ब्लाँक नं. ७ व ५ मधिल ९६ हजार रुपये किंमतीच्या ८ सोलर प्लेटा चोरुन नेल्यात. चोरीस विरोध केल्यावर ४७० सोलर प्लेटांचे तोडफोड करुन एकूण ५६ लाख ४० हजार रुपयाचे व त्याचप्रमाणे आवादा फर्मी सोलर कंपनीतील ब्लाँक नं. १६ मध्ये घुसून ब्लॉक नं. १६,११,८,९, ६ मधील ६६ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या ७ सोलर प्लेटा चोरुन नेल्यात. तसेच ४०० सोलर प्लेटा फोडून ३८ लाखांचे नुकसान केले. याप्रकरणी निंबा राठोड, पुंडलिक मदन राठोड, नवनाथ मदन राठोड, कडू महादू राठोड, सुनील सीताराम चव्हाण यांच्यासह ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. संजय ठेंगे हे करीत आहेत.
















