चाळीसगाव (प्रतिनिधी) थायलंड येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत शहरातील ७ वर्षीय चिमुकल्याने तिसरा क्रमांक पटकावत चाळीसगावचे नाव सातासमुद्रापार नेले आहे.
शहरातील पोदार शाळेत तिसरीत शिकणारा विदीत श्रेनिक जैन या विद्यार्थ्याची बँकॉक, थायलंड येथे होणाऱ्या अबॅकस व बुध्दिमत्ता, गणित या आतंरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. १४ देशातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी यात सहभात नोंदवला होता.
भारतातून २२ विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र झाले होते. दरम्यान, या स्पर्धेत विदीत याने अबॅकस व बुध्दिमत्ता, गणित या दोन्ही स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवला. या स्पर्धेत भारतातील दोन विद्यार्थ्यांना यश प्राप्त करता आले. यर्थाथ जैन या दुसरीतील विद्यार्थ्याने ही अबॅकसमध्ये दुसरा तर बुध्दिमत्ता गणितात चौथा क्रमांक पटकवला.
या विद्यार्थ्यांना सुषमा पाटील, नीलेश पवार, श्रद्धा जैन, पोदार शाळेच प्राचार्य अजय घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. भवरीलाल जैन, जवरीलाल जैन, कांतीलाल जैन, अशोक जैन, मनोज जैन, संदीप दगडा, प्रमोद गुलेचा, संदीप बेदमुथा, प्रितेश कटारीया, पवन चोपडा, सायरचंद जैन, जैन अलर्ट यंग ग्रुप ऑफ इंडिया आदींनी दोघांचे कौतुक केले आहे. या यशाबद्दल चाळीसगाव तालुक्यातून या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे.