चाळीसगाव (प्रतिनिधी) गावठी दारू माफियांविरोधात चाळीसगाव पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शहर पोलिस ठाणे हद्दीतील टाकळी पाटखडकी, पातोंडा, शिवारात छापे टाकून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी पोलिसांनी शेकडो लिटर मद्य व रसायन असा सुमारे ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट देखील केला.
चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने टाकळी पाटखडकी, पातोंडा, शिवारात छापे टाकले. या कारवाईत गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे २५० लिटर रसायन, २ हजार २८० लिटर कच्चे रसायन व १६० लिटर गावठी हातभट्टीची तयार मद्य असा ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर टाकळी प्र.चा. गोकुळ सदा भिल्ल, पाटखडकी येथील संतोष दामू सोनवणे, टाकळी प्र.चा. येथील प्रकाश गायकवाड, पातोंडा येथील भाऊसाहेब देवराम गायकवाड, वाघडू नागाव येथील बारकू खुशाल पाटील यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, विशाल टकले, सचिन कापडणीस, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार अजय मालचे, रमेश पाटील, पोलिस नाईक तुकाराम चव्हाण, किशोर पाटील अमित बाविस्कर, राकेश पाटील, पोलिस हवालदार नरेंद्र चौधरी, समाधान पाटील, सुनील निकम, ज्ञानेश्वर गीते, विनोद खैरनार, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रवीण जाधव, अमोल भोसले, नंदकिशोर महाजन, महेंद्र सूर्यवंशी, विजय पाटील, शरद वाघडू पाटील, चत्तरसिंग महेर, आशुतोष सोनवणे यांच्या पथकाने टाकळी प्र.चा. पाटखडकी, व पातोडा शेतशिवारात शेतशिवारात गावठी हातभट्ट्यांवर छापे टाकले. दरम्यान, दरम्यान, भविष्यातही अशीच कारवाई करण्याचा इशारा पो.नि. संदीप पाटील यांनी दिला आहे.