चाळीसगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या शिफारशीने तसेच ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर करण्यात आली आहे. सदर समितीच्या अध्यक्षपदी हिरापूर येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भैय्यासाहेब आनंदराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार समितीच्या इतर सदस्यपदी विविध समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विधवा, दिव्यांग, अनाथ व वृद्ध गोरगरिबांसाठी महत्वाची असणाऱ्या शासनाच्या या समितीवर गेल्या वर्षभरापासून अशासकीय पदे रिक्त होती. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सुचनेने सदर पदावर १० अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याने पुन्हा एकदा निराधारांच्या मानधन प्रकरणांना गती मिळणार आहे. संजय गांधी निराधार समितीवर नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
समिती सदस्य व त्यांचा प्रवर्ग पुढीलप्रमाणे –
१) अध्यक्ष – भैय्यासाहेब आनंदराव पाटील (हिरापूर)
२) मागासवर्गीय प्रतिनिधी – अभिषेक प्रभाकर मोरे (वडाळा वडाळी)
३) महिला प्रतिनिधी- सौ. मनीषा रवींद्र मराठे (तरवाडे)
४) विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग प्रतिनिधी – दिनकर धनसिंग राठोड (चैतन्य तांडा)
५) ओबीसी प्रतिनिधी – प्रभाकर पांडुरंग चौधरी (चाळीसगाव)
६) सर्वसाधारण प्रवर्ग प्रतिनिधी – प्रवीण शिवाजीराव मराठे (चाळीसगाव)
७) अपंग प्रवर्ग प्रतिनिधी – सचिन लहू पाटील (टेकवाडे)
८) स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी – किशोर प्रल्हाद रणधीर (टाकळी प्रचा)
९)सामाजिक क्षेत्र प्रतिनिधी – शांताराम (पिंटू) गायकवाड (पातोंडा)
१०) जेष्ठ नागरिक प्रतिनिधी – देविदास हरी बच्छे (सायगाव)