यावल (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाची लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र लग्न झालेल्या नव-विवाहितेने सासरमधून पळ काढला आहे. याप्रकरणी तरुणाने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
या सदंर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंगबर देविदास फेगडे (वय ३० वर्ष रा.महाजन गल्ली यावल) असे तरुणाचे नाव असून यांनी यावल पोलीसांकडे दिलेल्या तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारीत म्हटल्यानुसार, अकलुद तालुका यावल येथील राहणारे साहेबराव कोळी आणी अनिल परदेशी यांनी व बहीणाबाई रावसाहेब अंबुरेरा (राहणार दर्गा रोड परभणी) यांनी जालना येथील राहणार्या एका गरीब कुटुंबातील तरूणीशी विवाह लावुन देण्याच्या नावाखाली आपली फसवणुक केली आहे. यात म्हटले आहे की, दि.७ नोव्हेंबर २०२० रोजी यावल येथील विठ्ठल मंदीरात हिन्दु रितीरिवाजा प्रमाणे आपला जालना येथे राहणारी तरुणी सोनाली कुर्हाडे हिच्याशी विवाह लाऊन देण्यात आला होता.
मात्र दि.१२ नोव्हेंबर रोजी घरात एकटी असलेल्या सोनाली कुर्हाडे हिने घराचा दरवाजा बंद करून चाबी शेजार्या दिली व मी मंदीरात जावुन येते. असे सांगुन अंगावरील २५ हजार रुपये किमतीचे दागिने व ५ हजार रुपयांच्या साड्या व मोबाईल घेवुन गेली. ती उशीरापर्यंत न आल्याने अखेर लग्न लावणार्या साहेबराव कोळी यांच्याशी मोबाईलवर सोनाली संदर्भात विचारणा केली असता कोळी यांनी आपण तुझे लग्न लावुन दिले आहे सोनाली बहीणाबाई यांना आपण ओळखत नसल्याचे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपली लग्न लावुन देण्याच्या नांवाखाली सुमारे एक लाख रुपयात फसवणुक झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्याने या चारही जणा विरुद्ध यावल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.