पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील दुसखेडा येथील नवरदेवाची लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरी मुलगी आलीच नाही म्हणून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडे गुजराचे या गावातील आरोपी राजेश्वर नारायण पाटील हा लग्न जमविण्याचे काम करतो. पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील रवींद्र प्रकाश पाटील याला व्हाट्सअँपवरुन एका मुलीचा फोटो टाकला आणि तुला ही मुलगी पंसद असेल तर तुझा विवाह या मुलीशी लावुन देतो. असे सांगून नवरदेव मुला कडुन तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये रोख मुलीचे दागिने आणि अजुन एका मध्यस्थी ला देण्यासाठी घेतले असता नवरी घेऊन येतो असे आरोपीने विश्वासाने सांगितले. म्हणून दुसखेडा येथे दि. २२ जुन २०२१ रोजी चि. रविंद्र चा विवाह सोहळाचे आयोजन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे हळद लावली गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न जमविणाऱ्या बहाद्दरने मोबाइल स्विच अॉफ करुन टाकला. विवाहसाठी आलेल्या वर्हाडी नवरीची वाट बघुन थकुन गेले तेव्हा हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले.
आरोपी राजेश्वर हा फेसबुक वरून मुलींचे फोटो डाऊनलोड करून अशाच प्रकारे फसवणूक करीत आहे. त्याच्या विरोधात आज पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव, नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.