जळगाव (प्रतिनिधी) ओटीपी विचारुन इंजिनिअर तरुणीची १ लाख ९७ हजार ८९७ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात इंजिनिअर निकिता जितेंद्र कोल्हे (वय २६, रा. रणझोड नगर पंचमुखी हनुमान मंदिरामागे जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ७ मार्च २०२२ रोजी फिर्यादीचा मोबाईल क्रमांक वर ८०५१४२९४३६ या मोबाईल क्रमांक धारकने फोन करुन फिर्यादीचे मोबाईलवर आलेला ओटीपी विचारुन फिर्यादीचे आयसीआयसीआय बैकेंचे क्रेडीट कार्ड मधुन ५ ट्रांन्झक्शन करुन एकुण १,९७,८९७ रुपयांची फसवणुक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रमोद कटोरे करीत आहेत.
















