जळगाव (प्रतिनिधी) शिवजयंतीनिमित्त सुरु असलेल्या मिरवणकीवर अज्ञात समाजकंटकांनी तुफान दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले असून यामध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे. सुमारे वीस मिनिटानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी दहा ते बारा संशयितांना ताब्यात घेतले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती निमित्त मिरवणुक काढली जात असते. यंदा देखील गुरुवारी दि. २८ मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक भव्य मिरवणुक निघाली होती. ही मिरवणुक रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे पोहचली. यावेळी अचानक समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. मिरवणुकीवर होणाऱ्या तुफान दगडफेक झाल्यामुळे पळापळ झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली), घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह पाच ते सहा तरुण व दोन होमगार्ड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात दाखल करीत उपचार करण्यात आले. दरम्यान, मिरवणुकीतील वाहनाचा एका प्रार्थनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला धक्का लागला. यामध्ये तो कॅमेरा तुटल्यामुळे दगडफेक करण्यात आल्याचे कळते.
पोलीस अधीक्षकांची
घटनास्थळी पाहणी घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच नागरिकांना शांतता ठेवून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
वीस मिनिटांतर मिळवले नियंत्रण
दगडफेक झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी आल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
गावात तणावपूर्ण शांतता ; परिस्थिती नियंत्रणात
आल्यानंतर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबविण्यात आली. यावेळी दगडफेक करणाऱ्या सुमारे दहा ते पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, यावेळी गावात तणावपुर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा