TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मातोश्रीबाहेर पहारा देणाऱ्या 92 वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस ; म्हणाले, आजी काळजी घ्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राणा विरुद्ध शिवसेना हा संघर्ष गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. अशातच मातोश्रीचं सुरक्षा कवच बनलेल्या शिवसैनिकांमध्ये एक 92 वर्षांच्या आजीबाईही होत्या. एका वृत्तसंस्थेने त्यांच्याशी बातचित केल्यानंतर आता आजींची दखल थेट मातोश्रीवरुन घेण्यात आली आहे. राणांविरोधात आंदोलन करणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर आजी काळजी घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा आजींना सांगितलं आहे.

दरम्यान, या आजी सकाळपासून मातोश्रीबाहेर पहारा देत असून आमच्या वहिनींना, साहेबांना त्रास देतायत, आम्ही त्यांना इंगा दाखवणारच, असा इशाराही राणा दाम्पत्यांना दिला आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी यानिमित्तानं संवाद साधला, त्यावेळी त्यांना आपलं वय विचारलं त्यांनी सांगितलेलं वय ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. माझं वय 92 वर्ष असल्याचं आज्जींनी सांगितलं.

आज्जींनी सांगितलं की, “राणा आलेत ना, दोन दिवस त्रास देतायत मातोश्रीवर. आमच्या वहिनींना त्रास देत आहेत ना, म्हणून आम्ही शिवसैनिक त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? माझं वय 92 वर्ष आहे. आमच्या साहेबांवर संकट आलेलं आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोघजण येऊन आम्ही गपचूप जाऊ. पण आम्ही भिणार नाही. तू आमच्या समोर ये. शिवसेनेसाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय, अजून हरणार नाही. तुम्ही येऊन दाखवाच. मातोश्रीवर येऊन दाखवच.”

आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही : शिवसैनिक आजी

“मी बाळासाहेब होते तेव्हापासून शिवसैनिक आहे. तेव्हापासूनच मी मातोश्रीवर येते. साहेबांनाही भेटले होते मी. काही लोकं उद्धव साहेबांना सारखं छळतायत. त्यांना मी सांगते, आमच्या साहेबांना छळण्याऐवजी आमच्यासमोर येऊन दाखवा तुम्ही. त्यांना छळू नका. ते जनतेसाठी चांगलं काम करत आहेत. ते तुमच्यासारखी लबाडबाजी करत नाहीत.”, असा इशारा आजीबाईंनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.

बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिक असणाऱ्या या आज्जी आज सकाळपासूनच युवासैनिकांसोबत मातोश्रीबाहेर पाहारा देताना दिसून आल्या. युवासैनिकांसोबत मोतोश्रीबाहेरील रस्त्यावर बसून आज्जीबाईंनी भजनं आणि आरत्या गाण्यास सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे निवासस्थान मातोश्री म्हणजे, शिवसैनिकांसाठी आजही जणू मंदिरासारखं, असं अनेक शिवसैनिक सांगतात. अशातच या 92 वर्षांच्या आज्जी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात बसून मातोश्रीचं सुरक्षाकवच म्हणून खंबीरपणे उभ्या असल्याचं दिसून आलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

रावेर : प्रेमीयुगुलाने शेतात घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; बैलांसाठी गवत कापताना शेतात घडली दुर्घटना !

September 25, 2023

ब्रेकिंग न्यूज : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश !

July 11, 2022

परमपूज्य संतशिरोमणी १०८ आचार्यश्री विद्यासागरजी महामुनिराजांना धरणगावात विनयांजली अर्पण !

February 25, 2024

धक्कादायक : दिराने केला वहिनीचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

May 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group