नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने डीएनएवर आधारीत जगातील पहिल्या Zycov-D या झायडस कॅडिलाच्या कोरोनावरील लसीला काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली. दरम्यान, आता येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना कोरोनावरील Zycov-D ही लस दिली जाईल, असे NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे.
येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना कोरोनावरील लस दिली जाईल. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. सर्वप्रथम प्राधान्याने या मुलांना ही लस दिली जाईल, असं अरोरा यांनी सांगितलं. राज्य सरकारांनी मुलांच्या बौद्धीक विकासासाठी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी राज्यांनी तयार करावी. यामुळे या मुलांना सर्वात आधी लस मिळू शकेल. Zycov D लस देण्याच्या आधी ही यादी जाहीर केली जाईल. या यादीच्या आधारावर १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गंभीर आजार असलेल्या मुलांना लस देण्यास सुरुवात केली जाईल, असं अरोरा यांनी सांगितलं.
देशात १२ ते १७ वर्षांदरम्यानच्या मुलांची एकूण संख्या ही १२ कोटी आहे. तंदुरुस्त मुलांमध्ये कोरोनाने गंभीर आजार किंवा मृत्युची शक्यता खूप कमी असते किंवा नसतेच. सरकारला चिंता फक्त गंभीर आजार असलेल्या मुलांची आहे. यामुळे गंभीर आजार असलेल्या लहान मुलांना करोनाची लस सर्वात आधी दिली जाणार आहे.