बोदवड (प्रतिनिधी) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गतच भाजपा बोदवड तालुका व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महादेव मंदिर, धोंडखेडा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य शिबिरात नाक, कान, घसा तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, मुतखडा तपासणी करण्यात आली. तर आवश्यक रुग्णांवर गोदावरी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सुमारे ४७५ स्त्री-पुरुषांनी आरोग्य तपासणी करवून घेतली. भाजप तालुका उपाध्यक्ष विक्रमसिंग पाटील यांनी आयोजित केलेल्या या शिबिरास खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह डॉ.राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जेष्ठ कार्यकर्ते अनंत कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, डॉ.केतकी उल्हास पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, भाजपा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, संतोष चौधरी, बोदवड शहराध्यक्ष नरेश अहुजा, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली कुलकर्णी, उमेश पाटील, परमेश्वर टिकारे, शुभम पाटील हे उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.