धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना दि.२४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आहेत.
या संदर्भात पहिली फिर्याद सुरज राहुल पाटील (वय २१, रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाचे कारणावरुन शिवदास विश्वास पाटील याने इकडून का आला?, असे म्हणुन शिवीगाळ केली. यानंतर समाधान गोकुळ पाटील, विष्णु गोकुळ पाटील, गोकुळ संतोष पाटील, विश्वास संतोष पाटील (सर्व रा. दोनगाव खु.ता. धरणगाव) अशांनी देखील घरी येत आई वडील यांना शिवीगाळ केली. तर शिवदास पाटील याने डोक्यावर लोखंडी रॉड मारुन जखमी केले. तर विष्णू पाटील याने काठीने आईच्या तोंडावर मारुन दात पाडला, इतर आरोपी मजकुर याने लाथाबुक्कांनी मारहाण करुन शिवीगाळ केली असल्याचे सुरज पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.
दुसरी फिर्याद विष्णू गोकुळ पाटील (वय ३५, रा. दोनगाव खुर्द ता. धरणगाव) यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या घरातील भांडणाचा विषय आहे. तुम्ही आम्हाला शिवीगाळ करु नका असे सांगितले असता संशयित आरोपी राहुल धुडकु पाटील, परशुराम चंद्रभान पाटील, विवेक संभाजी पाटील, सुरज राहुल पाटील (सर्व रा. दोनगाव खु.ता. धरणगाव) यांनी लाथाबुक्कांनी मारहाण काठीने डोक्याला मारुन जखमी केले. या प्रकरणी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.
















