भुसावळ (प्रतिनिधी) दुचाकीला धक्का लागल्याच्या वादातून शहरातील रेल्वे शाळेपाठे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लोखंडी रॉड, फायटरचा वापर करण्यात आल्याने दोघे जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी दंगल व अन्य कलमान्वये 14 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गटातील प्रत्येकी तीन आरोपींना अटक करण्यात आली. हाणामारीचा प्रकार रविवार, 24 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडला.
पहिल्या गटाच्या तक्रारीवरून आठ संशयीतांविरोधात गुन्हा !
रेखा दीपक म्यांद्रे (44, कवाडे नगर, फिल्टर हाऊसजवळ, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद उफाळला. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवत फिर्यादीला शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी रॉड तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने डाव्या हाताच्या मनगटासह बरकडीला दुखावत झाली. याप्रकरणी अन्वर मिर्झा, लखन (कवाडे नगर, भुसावळ), प्रज्ञा शिंदे, अजय शिंदे, आनंद शिंदे, दीपक शिंदे, अमीना मिर्झा (रेल्वे फिल्टर हाऊसजवळ, कवाडे नगर, भुसावळ) व अन्य एका अल्पवयीनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.
दुसर्या गटाची तक्रार ; सहा जणांविरोधात गुन्हा !
दुसर्या गटातर्फे अन्वर फय्याज मिर्झा (40, रेल्वे फिल्टर हाऊस, कवाडे नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली तर विकास गोरखा याने फायटरने उजव्या गालावर मारहाण केल्याने दुखापत झाली तसेच दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी विकास गोरखा, रेखा म्यांद्रे, तुषार म्यांद्रे, भावना म्यांद्रे, दीपक म्यांद्रे व एका अल्पवयीनासह (सर्व रा.फिल्टर हाऊस, कवाडे नगर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.