चाळीसगाव (प्रतिनिधी) धुळे एसीबीने चाळीसगाव पाटबंधारे विभागातील लिपिका लाच मागणी प्रकरणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तुषार अशोक पाटील, असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत दिला जातो मात्र पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर 1200 रुपये प्रमाणे 11 जणांकडून 14 हजार 400 रुपये मागणी करण्यात आली होती व या संदर्भात धुळे एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी सापळ्याच संशय आल्याने सापळा यशस्वी झाला नाही मात्र लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता तुषार अशोक पाटील यास अटक करण्यात आली.