नांदेड (वृत्तसंस्था) लोहा तालुक्यातील धनज (बु) येथे एका शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तुषार गौतम डांगे (वय १६), असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
धनज (बु) ता. लोहा येथील तुषार डांगे हा दहावीत शिकत होता. तुषार दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घराशेजारी असलेल्या सीताफळाच्या झाडावर सीताफळ तोडण्यासाठी म्हणून छतावर चढला. परंतु घरातील विजेची तार तुटुन छतावरील पत्र्यावर पडली व पत्र्यात वीज उतरल्याने त्याला जोराचा झटका बसला. त्यात तो गंभीर भाजल्याने त्याला घरच्यांनी लगेच विष्णुपुरी येथील डॉ. कै. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मयत तुषार डांगे याच्या पश्चात आई-वडिल, बहीण असा परिवार आहे. मुलाचा मृतदेह बघताच आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.