TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अनलॉक’बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पारित ; वाचा संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 6, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात कोरोनाला काही प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशनानुसार जिल्हा प्रशासनाने अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बर्‍याच प्रमाणात शिथीलता आणि काही निर्बंध कायम ठेवून आदेश निर्गमित केले आहेत.

राज्यात पुन्हा अनलॉक करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली. ज्याअर्थी, शासन आदेश दि. ४ जून, २०२१ नुसार जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हा दोन्ही निकषांची पूर्ततेनुसार पाच स्तर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जळगाव जिल्हयातील निर्बंध हे दर आठवड्यांच्या आकडेवारीनुसार या पाच स्तरात लागू राहतील.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

पाच स्तर नेमके कसे आहेत?

पहिला स्तर : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवा स्तर : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

जारी केलेल्या निर्देशानुसार खालील प्रकारे अनलॉक :

१) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र यासाठी सॅनिटाईझोनसह अन्य नियमांचे पालन करावे लागले. दुकानात एका वेळी पाच पेक्षा ग्राहक नसावेत याची काळजी घ्यावी लागेल. दुकानाच्या दर्शन भागामध्ये बँकेप्रमाणे काऊंटर लाऊन काच अथवा प्लास्टीकची पारदर्शक शीट लावावी लागणार आहे.

२) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे : ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.

३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.

४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग : पूर्ववत सुरू करण्यात येतील.

५) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.

६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील.

७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.

८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.

९) विवाह व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.

१०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी.

११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी.

१२) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत.

१३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.

१४) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू.

१५) माल वाहतूक : पुर्ववत सुरू.

१६) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग आहे त्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास आवश्यक राहील.

१७) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार.

१८) सार्वजनीक ठिकाणी वावरणे : कोणतीही बंदी नाही. म्हणजेच संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आलेली आहे.

१९) कृषी विषयक कामे व दुकाने : नियमीतपणे सुरू.

२०) ई-कॉमर्सचे व्यवहार : नियमीतपणे सुरू राहणार.

जिल्हाधिकार्‍यांनी अनलॉकचे निर्देश जारी करतांना नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर, फिजीकल डिस्टन्सींग, सॅनिटायझेशन आदींचे नियम पाळावे लागणार आहेत. तसेच जळगाव जिल्ह्याचा पॉसिटीव्हिटी दर ५ % किंवा अधिक झाल्यास किंवा ऑक्सिजन बेडची २५% पेक्षा जास्त झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येईल.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२४ !

September 8, 2024

चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिपचे वितरण !

July 5, 2023

बुलडाण्यातील नेते प्रसेनजीत पाटील यांनी हाती बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

June 23, 2021

शेतातून घरी जात असताना वाहनाची धडक ; शेतकऱ्याचा मृत्यू

June 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group