जळगाव (प्रतिनिधी) : जळगावातून चोपडा येथे जात असताना मॅक्झीमो व आयसरच्या धडकेत १० प्रवासी जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. यात जखमी रुग्णांना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेली माहिती अशी की, चोपड्यावरून जळगावकडे एम.एच.६३सी.४७४७ ही आयशर येत असताना धानोरा गावाजवळ जळगावहून चोपड्याकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक एम.एच.१९बी.यु.४९७७ यांच्यात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहे. तर यातील ६ प्रवासीना शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत तर अन्य प्रवाशांना शहरातील खाजगी रुग्णालयात नेले असल्याची माहिती आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल असेलेल रुग्णामध्ये नितीन सोनवणे(वय ३८ रा. शनिपेठ,जळगाव), मनोज गवळी(वय ३५, रा. शनिपेठ,जळगाव), शोभाबाई आढाळे(वय ३० पिप्राळा, जळगाव), श्रीरामरूपसिंग (वय ४५), बन्सीलाल सुरसिंग (वय ३५), घनश्याम आढळकर(वय ३८) सर्व रा.धानोरा हे जखमी झाले आहेत. यांच्यावर शासकीय वैदकीय महाविद्यालयात वैदकीय अधिकारी उपचार करीत आहेत.