बोदवड (प्रतिनिधी) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनंतर बोदवड बस स्थानकावर दुसऱ्या वाहतूक नियंत्रकाची नेमणुक करण्यात आली आहे. विद्यार्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता याबाबतची मागणी शिवसेना अल्पसंख्याक आघाडी उपप्रमुख कलीम शेख यांनी आ. पाटील यांच्याकडे केली होती.
बोदवड बस स्थानक येथे वाहतुक नियंत्रक चौकशी कक्ष हे सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंतच सुरु असल्याने प्रवाशी व विद्यार्थी यांना बससंबंधी माहिती मिळत नव्हती. बोदवड शहरातील शाळा संध्याकाळी ५.३० वाजे पर्यंत असतात तर बस त्यानकामध्ये बऱ्याच बसेस ह्या ६ वाजता असतात. त्यामुळे बस स्थानकावर विद्यार्थी यांची भरपूर गर्दी असते. यावेळी त्यांना बस आहे किंवा नाही?, हे सांगणारे वाहतूक नियंत्रक नसतात. बोदवड येथील बस स्थानकावरील चौकशी कक्ष हे सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक आघाडी उपप्रमुख कलीम शेख यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. आमदार पाटील यांनी मागणी लक्षात घेऊन मुक्ताईनगर येथील आगार प्रमुख संदीप साठे व स्थानकप्रमुख अनिल बावसकर यांच्याशी संपर्क करून येथील बस स्थानक येथे दुसरे वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करण्यासाठी सूचना केली. त्यानुसार त्वरित बोदवड येथे असलेले वाहतूक नियंत्रक बी.आर.खान यांच्या सोबत नवीन वाहतूक नियंत्रक जी. एस.सोनवणे यांनी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना परिवाराच्या वतीने या दोघांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख कलीम शेख, नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक राजेश नानवाणी, गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक सुनील बोरसे, तालुका संघटक शांताराम कोळी, देवेंद्र खेवलकर, शहर प्रमुख राहुल शर्मा, आतिश सारवान, धनराज गंगातीरे, असलम बागवान, योगेश बायदे ,तौसीफ पिंजारी, सचिन भोई, अजय राजपूत, जाबिर खान, इम्रान खान, रईस शेख, गोपाल पाटील, अमोल पाटील, गजानन भोंडेकर, समीर भाई, भास्कर गुरचळ यांच्यासह सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष,, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.