TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरक्षण टिकवण्यासाठी सोबत या ; पालकमंत्री ना. पाटलांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथे आज ओबीसी परिषद परिषद पार पडली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात भाजपला लक्ष्य केले. राज्यात ६२ टक्के ओबीसी आहेत. मग आम्हाला आरक्षण दिलेच पाहिजे. यांना देशातील आरक्षण संपवायचे आहे. हे आरक्षण संपू द्यायचे नसेल तर जो नेता या लढ्यात पुढे उभा राहिला आहे, त्याच्या पाठीशी आपल्याला उभे रहावे लागेल, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

देशात सन १९३१ पासून जातनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाला लोखसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालेले नाही. आकडेवारी उपलब्ध न झाल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याने शासनाने आता २०२१ ची तसेच पुढील सर्व जनगणना जातनिहाय कराव्यात. केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा राज्य सरकारला उपलब्ध द्यावा यासह सात ठराव आज शनिवारी जळगावात झालेल्या ओबीसी आरक्षण हक्क परिषदेत पारीत करण्यात आलेत.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

जळगावातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या पुढकाराने आज शनिवारी ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री सतीष पाटील, आमदार कपिल पाटील, धनगर समाजाचे नेते रामहरी रूपनवर, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, डॉ. ए.जी. भंगाळे, माजी आमदार संतोष चौधरी, संजय पवार, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छगन भुजबळ पुढे म्हणाले, खासगी संस्थांमध्येही आरक्षण मिळावे, ही मागणी रास्त आहे. कारण आज सर्वत्र खासगीकरण होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. २०१६ पासून त्यांचे राज्य आहे. सगळा डाटा त्यांच्याकडे आहे. तुम्ही ओबीसींचे पालनहार आहात तर मग चुका दुरुस्त का केल्या नाहीत. २०१९ मध्ये फडणवीस यांनी अध्यादेश काढला. तरीही केंद्र सरकारकडून इंपिरिकल डाटा मिळाला नाही. आता आम्ही डाटा मागितला. तरी मिळाला नाही. आता करायचे काय ? महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे आहोत. केंद्राने इंपिरिकल डाटा द्यायला नकार दिला आहे. आम्ही यासाठी भांडणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. तुमच्या सगळ्यांची ताकद असताना भुजबळ कोणालाही घाबरणार नाही. आमचा मनुवादाला विरोध आहे. त्या मनुवादी प्रवृत्तीला विरोध आहे. म्हणूनच या चळवळीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगीतले.

तर तुमच्या घरी इन्कम टॅक्सवाले येतील

याठिकाणी ओबीसी आरक्षण परिषदेत अनेकजण तावातावात केंद्र सरकारच्या विरोधात बोलले. त्यामुळे उद्या इन्कम टॅक्सवाले तुमच्या घरी आले नाही म्हणजे झालं… एकनाथ खडसेंनाही आज असाच त्रास होत आहे. त्यामुळे सावध रहा बरं का… जे घाबरले असतील त्यांनी भाजपमध्ये जावं… मग सब माफ…असा टोल भुजबळ यांनी लगावताच सभागृहात हशा पिकला.

आरक्षण टिकवण्यासाठी सोबत या

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाषणात भाजपला लक्ष्य केले. राज्यात ६२ टक्के ओबीसी आहेत. मग आम्हाला आरक्षण दिलेच पाहिजे. यांना देशातील आरक्षण संपवायचे आहे. हे आरक्षण संपू द्यायचे नसेल तर जो नेता या लढ्यात पुढे उभा राहिला आहे, त्याच्या पाठीशी आपल्याला उभे रहावे लागेल, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी दिला.

ओबीसी परिषदेत पारित ठराव

२०२१ ची जनगणना व पुढच्या सर्व जनगणना जातीनिहाय व्हाव्यात
केंद्र सरकारने राज्य सरकारला इंपिरिकल डाटा उपलब्ध करून घ्यावा
५० टक्क्यांची अट रद्द करावी
आर्थिक निकषांवरील क्रिमिलेअरची अट रद्द करावी
खासगी संस्थांच्या मध्येही ओबीसी आरक्षण असावे
ओबीसी समाजातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती करावी
ओबीसी हीच आमची ओळख, असा निर्धार ओबीसी आरक्षण हक्क परिषदेला सर्व उपस्थित करत आहोत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

94.3 MY FMतर्फे प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी फँटास्टिक फार्मर अवॉर्ड वितरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहीद दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन

March 23, 2021

जळगाव महापालिकेत सत्तांतर निश्चित : खडसे

March 15, 2021

दुर्दैवी घटना : रेल्वेरुळ ओलांडताना धावत्या रेल्वेच्या धक्क्याने शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू !

July 16, 2024

‘दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर मंत्र्याचे सुरक्षारक्षक तैनात ; नारायण राणेंचा खळबळजनक आरोप !

February 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group