पारोळा (प्रतिनिधी) आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना दिनांक ६ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.
आमदार चिमणराव पाटील हे चोपड़ा येथे नातेवाईकांच्या सांत्वनासाठी गेले होते तेथून पारोळ्याकडे परतत असताना अमळनेर येथील सिंधी कॉलनी जवळ आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाचा अपघात झाला. आमदार चिमणराव पाटील हे चोपड्याकडून अमळनेरकडे येत असतांना हा अपघात झाला आहे. पुढे आमदारांची गाडी होती तर मागे त्यांच्या सुरक्षा रक्षकांची गाडी होती.
चोपडा- अमळनेर रस्त्यावर सिंधी कॉलनी जवळ ब्रेकर आल्याने आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागे येणाऱ्या सुरक्षा रक्षकांची गाडी त्यांच्यागाडीवर धडकली. सुदैवाने आमदार चिमणराव पाटील यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरुप आहे. यावेळी त्यांचा पी.ए. चेतन पाटील, सुरक्षा रक्षक गाडीत होते.