मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संभाजीनगर येथे सन २०१३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला होता ते प्रकरण चौकशीत निष्पन्न झालेले असतांना ते प्रकरण दडपल्या प्रकरणी संभाजीनगर येथील बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी पदोन्नती घेतल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंके यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झाले असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. या प्रकरणात देखील न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ. एकनाथ खडसे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये औरंगाबाद पश्चिम येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांच्या विरुध्द तक्रारींवरुन औरंगाबाद ते जालना रस्ता, सेवूर रस्ता, खुलताबाद ते फुलब्री रस्ता, सेव्हन हिल उड्डान पुल या कामात घोळ झाल्याचे सिध्द झाल्याने दक्षता व गुणनियंत्रक विभागाने अहवाल दाखल केलेला तो अहवाल दडपला गेला तसेच सोनवणे यांनी खोटी पदोन्नती मिळविली या प्रकरणाची चौकशी करुन पदोन्नती रद्द करण्यात यावी अशी मागणी आ.खडसे यांनी केली आहे. सोनवणे यांच्यासह चौघांचे पाच प्रकरणांचा दक्षता व गुणनियंत्रक विभागाने अहवाल सादर केला बांधकाम विभागाचे सचिव सांळूके यांच्याकडे सादर केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कायदेशीर कारवाईची मागणी आ. खडसे यांनी केली आहे.
कागदपत्रांचा पाठपुरावा सुरु : सुभाष पाटील !
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक प्रकरणाचा पाठपुरावा सुरु असून ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून ही भ्रष्टाचाराविरुध्द लढाई सुरु असून निश्चितचं आम्ही जिंकू असा विश्वास माजी जि.प.सदस्य सुभाष पाटील यांनी व्यक्त केला.