जळगाव (प्रतिनिधी) ज्या भागात आपले बालपण गेले असा अंजनी नदी असुन ही कोरडा ठाक होता. नदीचे पुर्नज्जीवन करून ती पाण्याने तुडूंब भरली पाहीजे असा संकल्प केला होता. तो संकल्प पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने तथा लोकसहभाग व स्वत:च्या पैशातुन अंजनी नदी वर बंधारे बांधुन त्या नदीचे पुनरुज्जीवन करून पुर्ण केला त्याचा मनस्वी आनंद आहे, असे मत जि.प सदस्य तथा नियोजन समितीचे सदस्य गोपाळ चौधरी यांनी व्यक्त केले.
जलपुरुष डॉ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ‘आवो तापी नदी को जाने’ या वेबिनार सिरीजच्या १५ भागात गोपाल चौधरी यांचे ‘अंजनी नदी का कायाकल्प’या विषयावर व्याख्यान झाले.या वेबिनार मध्ये त्यांना आमंत्रीत करण्यात आले होते.ज्या नदीच्या काठावर बालपण गेले त्या नदीला कोरडी झालेले पाहुन तिचे पुनरुज्जीवन करण्याचा आपला मनोदय कसा पुर्ण केला या विषयी गोपाल चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गुजरात प्रसिध्द आर्किटेक्ट नेहा सरवटे यांचेही विश्वामित्री नदीवर व्याख्यान झाले. महाराष्ट्र जलबिरादरीचे प्रमुख नरेंद्र चुग यांनी ही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन खान्देशातील पारंपारिक बियाण्यांचे संशोधक प्राचार्य डॉ एच एम पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार विशाल सोनकुल यांनी मानले. इंजि भिला पाटील, पर्यावरण तज्ञ रोहित प्रजापती,समाजसेविका संगिता पाटील, विजय देशमुख आदिंची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
वेबीनार मध्ये अंजनी नदीचा कायापालट कशा पध्दतीने केला याबाबत गोपाळ चौधरी म्हणाले की,१९८५ च्या काळात पिंप्री सोनवद या पट्ट्यात उस,केळी यासारखे अधिक पाणी लागणारे पिक घेत होता. मात्र अंजनी नदीचे पाणीच गेल्या गेल्या काळात या भागात शेतीचे पाणी तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष झाले. हा भाग पुर्णत: कोरडवाहू झाला. या नदीचे पुर्नज्जीवन करण्याचा मनोदय आपला होता. मात्र व्यवसायीक असल्याने अनेक अडचणी आल्या.मात्र राजकारणात सक्रीय झाल्यानंतर स्वखर्च तसेच लोकसहभागातून नदीचा कायापालट केला.तब्बल ९ बंधारे बांधले,नदीतील झुडपे काढली,आता हा भाग गेल्या ४ ते ५वर्षापासून पाणीदार झाला याचा आनंद आहे असे ही त्यांनी सांगितले. अंजनी नदीचा कायापालट करणारे व स्वखर्चातून गोपाल चौधरी यांना बिझिनेस आयकॉन पुरस्कार, ओबीसी फौंडेशन द्वारा नॅशनल अवार्ड तथा २००८ मध्ये पुणे येथील राष्ट्रीय अर्थशास्र परिषदेत युवा उद्योजक आदि सन्मान त्यांना मिळाले आहे.