भुसावळ (प्रतिनिधी) देशात पेट्रोल, डिझेल व गॅस महागाईच्या विरोधात कॉग्रेसच्यावतीने शहरासह परिसरात ७ रोजी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करुन प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष ऍड. संदिप पाटील यांच्या नेतृत्वात भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीतर्फे केद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई दरवाढीच्या विरोधात शहरातील तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. प्रसंगी कार्यकत्याना शहराध्यक्ष रविंद्र निकम, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, संजय खडसे, सुखदेव सोनवणे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलिम गवळी, तालुका अध्यक्ष अकिल शहा, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, मुख्याध्यापक हमीद, जानी गवळी, शहर उपाध्यक्ष महेंद्र महाले, महिला जिल्हा उपाध्यक्ष राणी खरात, हमीदा गवळी, महिला शहर उपाध्यक्ष वंदना चव्हाण, ललित सपकाळे, विनोद धांडे, विधानसभा युवक अध्यक्ष इमान खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉंग्रेस अनुसुचित जाती निवेदन सादर – केंद्रातील भाजप सरकारच्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेश कॉंग्रेसचे योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस अनु जाती विभागाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सुरुवातीला योगेंद्र पाटील यांच्या हस्ते पंपाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली व पेट्रोल भरायला आलेल्या लोकांना गुलाबपुष्प देऊन केंद्र सरकारचा अनोखा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे योगेंद्र पाटील, जळगाव जिल्हा कॉंग्रेस अनुजाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी, कॉंग्रेस अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, सागर कुरेशी, सेवादल अध्यक्ष तस्लिम खान, जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जवरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.