धरणगाव (प्रतिनिधी) आखिल भारतीय मराठा महासंघाच्या विविध पदांवर निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा धरणगाव शहर काँग्रेस कमिटी व मित्र परिवारतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी चंदन पाटील कार्याध्यक्ष, आखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव, गोपाल पाटील जिल्हा संघटक, आखिल भारतीय मराठा महासंघ जळगाव, भीमराज पाटील तालुका अध्यक्ष, आखिल भारतीय मराठा महासंघ धरणगाव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, दीपक जाधव, महेश पवार, नंदा महाजन, रामचंद्र माळी, विकास लांबोळे, बापू जाधव, योगेश येवले, रामकृष्ण पाटील, संतोष भडांगे, वाल्मिक पाटील, नंदू पाटील, किशोर पाटील, चंदू पाटील उपस्थित होते.