पाचोरा (प्रतिनिधी) कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा काँग्रेसने शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी राजाचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रात कृषि दिन साजरा होत असतानां शेतकरी नेता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या प्रेरणेतून पाचोरा काँग्रेस हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. पाचोरा काँग्रेसचे पदाधिकारी भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि तेथे शेतकऱ्यांना टोपी बागायतदार रुमाल मास्क सह बांधावर लावायचे झाडे देऊन शेतकऱ्यांना सन्मान केला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, दिपक सोनवणे, समाधान ठाकरे, शेतकरी संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, मदन देवरे, आदी उपस्थितीत होते.
काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बांधावर गेले तेव्हा सन्मान झाल्यावर शेतकरी भाउक झाले पहील्यांदा असा सन्मान होत आहे. जय जवान जय किसानसह काँग्रेस जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सर्व फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थितीत होते. काँग्रेसच्या कार्यक्रमाची चर्चा परीसरात होती.