TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘भरारी’ ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना ‘उभारी’

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in कृषी, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी आत्महत्या व कोविडमुळे घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याने या कुटूंबांना विविध अडचणींना सामोर जावे लागत असल्याने त्यांना भक्कम आधाराची गरज असते. ‘भरारी’ फाऊंडेशनने अशा कुटूंबांना शिलाई मशीन, शेळ्या तसेच खतांचे वाटप करुन त्यांना ‘आधारा’ बरोबरच ‘उभारी’ देण्याचे काम केले आहे. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज भरारी फाऊंडेशनच्यावतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि कोविडमुळे मृत्यु झाल्याने विधवा झालेल्या महिलांना शिलाई मशीन, शेळया, खतांचे वाटप जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी यांच्यासह लाभार्थी कुंटूंबिय उपस्थित होते.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

आत्महत्याग्रस्त कुटूंबांला स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, त्यांना आर्थिक मदत करणे, रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणेसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून नाशिक विभागात ‘उभारी’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस विभागातील विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आहेत.

जळगाव येथे भरारी फाऊंडेशन ही संस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे याकरीता जिल्ह्यात शेतकरी संवेदना अभियान गेल्या काही वर्षापासून राबवित आहेत. या अभियानाच्या माध्यमातूनच त्यांनी आनंदा मंजा अहिरे, रा. विटनेर, ता. पारोळा हा शेतकरी मागील काही दिवसांपासून तणावपूर्ण जीवन जगत असल्याने त्यांचे समुपदेशन करुन त्यांना शेतीला जोडधंदा म्हणून आज कृषिदिनी ३५ हजार रुपये किंमतीच्या सहा शेळ्या दिल्यात. त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील राहुल निकम हा शेतकरी आर्थिक अडचणीत असून शेतातील पिकांना खते व किटकनाशके घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याला खते, बी-बियाणे व किटकनाशके देण्यात आले. तर कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी निराधार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने कविता अनिल मराठे, शिरसोली व सुरेखा अनिल चव्हाण, जळगांव यांना शिलाई मशिनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
११४ गावातील ३० हजार शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण

भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील ११४ गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तीस हजार शेतकऱ्यांना भेटून सर्व्हे करण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजु व अडचणींत असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करणे, बी बियाणे उपलब्ध करून देणे, तणावात असलेल्या शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, मुलामुलींचे लग्न व शिक्षणासाठी मदत करणे आदि उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून करीत असून या अभियानासाठी सचिन महाजन, विनोद ढगे, जयदीप पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, सुदर्शन पाटील, रितेश लिमडा, दीपक विधाते व निलेश जैन हे परिश्रम घेत आहे. या उपक्रमासाठी त्यांना समाजातील विविध दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभत असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

यावेळी के. के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी, स्पार्क ईरीगेशनचे रविंद्र लढ्ढा, मुकेश हसवाणी, अमर कुकरेजा, लक्ष्मी ॲग्रोच्या संचालिका संध्या सुर्यवंशी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भट, अनिल कांकरिया, पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, किशोर ढाके, उद्योजक सपन झूनझूनवाला, योगेश पाटील, निलेश झोपे आदि उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

बीएचआर पतसंस्थेचा ताबा राज्य शासनाच्या सहकार खात्याकडे वर्ग करावा : अँड. जमील देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना म्हणजे मूक बायको’ ; सुजय विखेंची बोचरी टीका

March 27, 2022

तलवारीच्या धाकावर दहशत ; कुविख्यात संशयित आरोपी चाळीसगाव शहर पोलिसाच्या जाळ्यात !

August 1, 2023

सावदा प्रचा खून प्रकरण : मोठा भाऊच निघाला लहान भावाचा मारेकरी, धक्कादायक कारण आले समोर !

August 12, 2024

अत्यंत क्रूर पद्धतीने वृद्धाची हत्या ; धारदार पावशीने डोक्यावर वार, शरीरावर १३ ते १४ घाव !

September 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group