जळगाव(प्रतिनिधी) देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शनं होतायत. आज काँग्रेसचं देशभरात जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान, जळगावातही काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन काँग्रेस भवना बाहेर पार पडले.
या आंदोलनात मोदी सरकारने केलेल्या दरवाढी विरोधात घोषणाबाजी करून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, दीपक सोनावणे, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, जाकीर बिस्मिल्ला बागवान, सुधीर पाटील, सखाराम मोरे, अजमल शहा, मीरा सोनवणे, मुजीब पटेल , गणेश राठोड विशाल पवार, योगिता शुक्ल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकतें मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.