पाळधी जळगाव प्रतिनिधी – जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पारधी गावाजवळील झुरखेडे रोडवरील रेल्वे गेट ते पाळधी गावापर्यंतचा सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून, यामुळे नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. व्ही.डी. पाटील यांनी याआधी अनेकदा पंचायत समितीकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात ठोस आश्वासन मिळेपर्यंत दालनातून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. दोन तासांच्या आंदोलनानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ पंचायत समिती कार्यालयात गोंधळ उडाला होता.
बापू परिहार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















