जालना (वृत्तसंस्था) “देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बर्ड फ्लू हा आजार अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के एवढा असल्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजारानं मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. मृत कोंबड्या या एका पोल्ट्री फार्ममधील आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इतर कोंबड्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचं महाराष्ट्र देशातील आठवं राज्य बनलं आहे.
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ल्ड फ्लूने थैमान घातले असून आता त्याचा शिरकाव महाराष्ट्रातही झाला आहे. परभणी जिल्ह्यातील शेकडो कावळे या आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरीरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के एवढा असल्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.