यावल (प्रतिनिधी) बहुल्यावर चढण्याआधी कोरपावली गावचे सरपंच यांनी संविधान वाचन केले. कोरपावली येथे ग्रा.प., जि.प. मराठी मुलांची शाळा, जि.प. उर्दू शाळा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला.
आज स्वतःचे लग्न असून सुद्धा आधी कर्तव्य पार पाडून कोरपावली गावचे सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी संविधान वाचन करून संविधान दिवस साजरा केला. यावेळी माजी सरपंच जलील पटेल, मुख्यध्यपक धनराज कोळी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी, फिरोज तडवी, निवृत्ती भिरुड, जाकीर, रमेश काळे, असलम तडवी, कुतबुद्दीन, भरत चौधरी, रोहित अडकमोल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.