TheClearNews.Com
Wednesday, July 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्राहकांनो, विजेचा वापर काटकसरीने करा ; महावितरणचे सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून मागणीप्रमाणे तब्बल २४००० ते २४५०० मेगावॅट विजेचा सुरळीत व विनाव्यत्यय वीजपुरवठा करण्यात येत आहे. मात्र उष्णतेची लाट आणखी तीव्र होत असल्याने ही मागणी यापुढे २५ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सर्वच ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यात समतोल राखण्यासाठी विशेषतः सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच विजेच्या मागणीने तब्बल २८ हजार मेगावॅटचा उंबरठा ओलांडला आहे. यामध्ये महावितरणच्या कार्यक्षेत्रात विजेच्या मागणीने गेल्या पंधरवड्यापासून सर्व उच्चाकांचे विक्रम मोडीत काढले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत विजेची कमाल मागणी २० हजार ८०० मेगावॅटवर गेली होती. मात्र ही मागणी यंदा तब्बल ३६०० मेगावॅटने वाढली आहे व अधिक वाढण्याची शक्यता आहे. आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार महावितरणने गुरुवारी (दि.२४-मार्च) मुंबई वगळता उर्वरित राज्यभरात महाविक्रमी २४ हजार ४०० मेगावॅट विजेचा सुरळीत पुरवठा केला. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) २४ हजार ६५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महावितरणकडून सर्वाधिक मागणीनुसार वीजपुरवठा करण्यात येत आहे, हे विशेष.

READ ALSO

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या उपलब्धतेमध्ये तूट निर्माण झाली होती. परंतु विजेच्या मागणीत मात्र फारशी वाढ झालेली नव्हती. तथापि सद्यस्थितीत कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक प्रकल्पांमधून प्राप्त होणाऱ्या वि‍जेमध्ये २०००-३००० मेगावॅटपर्यंत घट झाली आहे. याउलट विजेच्या मागणीत मात्र ऐतिहासिक व अकल्पित वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची उपलब्धता व मागणीमध्ये ताळमेळ साधणे महावितरणसाठी जिकिरीचे झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत पुरेसा कोळसा नियमित उपलब्ध व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवर देखील प्रयत्न सुरु आहेत.

अभूतपूर्व विजेच्या मागणीमुळे वीजखरेदी देखील वाढविण्यात आली आहे. महावितरणकडून प्रामुख्याने कोळशावर आधारित विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. महानिर्मिती, एनटीपीसी व एनपीसीआयएल तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्लू इत्यादी कंपन्यांसोबत महावितरणने एकूण २१ हजार २६९ मेगावॅट वीजखरेदीचा करार केला आहे. मात्र कोळशाची टंचाई व अन्य कारणांमुळे सद्यस्थितीत फक्त १५ हजार ५५० मेगावॅट एवढीच वीज उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे सौर व इतर अपांरपरिक ऊर्जास्त्रोतांद्वारे सध्या ३५०० ते ४००० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. तरीही विजेची वाढती मागणी व उपलब्ध वीज यामध्ये तूट निर्माण होत असल्याने विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला खुल्या बाजारातून सद्यस्थितीत सुमारे २००० मेगावॅट वीज खरेदी करावी लागत आहे. इतर राज्यांमध्येही सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. परिणामी खुल्या बाजारातील विजेचे दर देखील वाढले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरण मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. सध्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली सुरु असली तरी त्यास थकबाकीदारांकडून पुरेसा प्रतिसाद नाही. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून सध्या विजेची मागणी वाढली आहे. सोबतच प्रखर उन्हामुळे इतर ग्राहकांचा वीजवापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विजेची खरेदी आणि आर्थिक ताळमेळ साधण्यात महावितरणची कसरत सुरु आहे. सुमारे २४००० ते २४५०० मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणच्या चोख नियोजनामुळे कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करावे लागले नाही, हे उल्लेखनीय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

June 30, 2025
जळगाव

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

June 30, 2025
क्रीडा

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
Next Post

Exclusive : जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री ; तरुणाई व्यसनांच्या विळख्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल येथे आ. शिरीष चौधरी यांच्या वाढदिसनिमित्त दिव्यांग बांधवांना सायकल वाटप !

June 15, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज साधणार जनतेशी संवाद, मोठी घोषणा करण्याची शक्यता

November 22, 2020

जळगाव महापालिकेचे चार नगरसेवक सहा वर्षासाठी अपात्र ; आयुक्तांनी काढले आदेश !

December 2, 2023

धानोरा व उचंदा येथील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी !

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group