जळगाव (प्रतिनिधी) आज शहरात अहमदनगर येथे झालेल्या कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसह लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चा च्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिनांक १३ जुलै २०१७ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील ताईवर काही नराधमांनी दुष्कृत्य करत तिचा निर्घृण असा खून केला ह्या घटनेला आज बरोबर पाच वर्ष पूर्ण झालीत. मात्र अद्याप त्या नराधमाना फाशी झाली नाही ह्या बद्दल रोष व्यक्त करत अपराध्यांना फाशीची शिक्षा देण्याचा घोषणा देण्यात आल्या व जळगाव शहरातील मराठा क्रांती मोर्चा व लोक संघर्ष मोर्चा च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निर्भयाचा बॅनर समोर मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चा च्या प्रतिभा शिंदे, मराठा महासंघ चे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील व मराठा क्रांती मोर्चा चे सुनील गरुड राष्ट्रवादी चे संजय पवार व रवी देशमुख यांची भाषणे झालीत ह्या श्रद्धांजली कार्यक्रमात जो पर्यंत कोपर्डी च्या ताईला न्याय मिळत नाही तो पर्यंत ही लढाई चालूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. ह्या वेळी सचिन धांडे, प्रमोद पाटील, अॅड. सचिन चव्हाण, महेश पवार, पराग पाटील, सागर पाटील, नरेंद्र पाटील, हरीश कदम, योगेश कदम, भगवान शिंदे, आकाश साळुंके, एस.पी. पाटील, प्रमोद घुगे,सचिन माळी व लोक संघर्ष मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी हजर होते.