TheClearNews.Com
Thursday, May 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in जळगाव, भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लडाख येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले भडगाव येथील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर आज सकाळी गिरणा तीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भडगाव येथील टोणगाव परिसरात राहणारे निलेश सोनवणे हे सन २०१० मध्ये सैन्य दलात महार बटालियनमध्ये भरती झाले होते. जवान निलेश सोनवणे हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना १० जुलै रोजी सकाळी लेह लडाख येथे वीरमरण आले होते. आज त्यांचे पार्थिव औरंगाबादहून सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी आणल्यानंतर त्यांच्या परिवाराने आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

READ ALSO

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर परिसरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय जवान, जय किसान, वंदे मातरम्, भारत माता की जय, अमर रहे, अमर रहे, निलेश सोनवणे अमर रहे अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात युवा वर्ग, परिसरातील नागरिक, नातेवाईक सहभागी झाले होते. मिरवणूक जाणा-या रस्त्यांवर नागरिकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढली होती.

गिरणा तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणा-या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिल्यानंतर ग्रिनिडियाल टी. ए.११८ बटालियन, भुसावळ युनिटच्या जवानांनी व त्यानंतर जळगाव पोलीस मुख्यालयातील जवानांच्या तुकडीने आकाशात बंदुकीच्या ३ फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली.

याप्रसंगी आमदार किशोर पाटील, तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी वाघ, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर, पोलीस उपनिरीक्षक पठारे, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्यासह तालुक्यातील व परिसरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, युवा व महिला वर्ग, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
Next Post

धक्कादायक : एका अज्ञात व्यक्तीने उस्मानाबाद उमरगा नगरपालिका क्षेत्रात बांधले तब्बल १७ रस्ते !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणूक काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पाळधीचे एपीआय प्रशांत कंडारे यांचा सन्मान !

November 30, 2024

महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय ; जळगावमध्ये पिंक ऑटो प्रशिक्षण शिबिराला उत्साहात सुरुवात..

February 17, 2025

स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द

October 14, 2020

‘स्वातंत्राचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘तिरंगा एक्सप्रेस’चे भुसावळ स्थानकावर स्वागत !

August 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group