मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 961 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 961 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा हाच आकडा काल 889 इतका होता. गेल्या आठ दिवसात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत रोज वाढ होताना दिसत आहे. मुंबई आणि राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा आवर्जून वापर करावा, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 961 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आता पुन्हा मृत्यू होऊ लागले आहेत. कोरोनामुळे मुंबईत गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या 4880 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.