मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी (Higher And Technical Education Minister Uday Samant) दिली आहे.
मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
– राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
– दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार
– परीक्षा ही ऑनलाईन होणार
– काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी
– प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश
– वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय
– परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार
– महाविद्यालयानी विद्यार्थ्याचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना
-विद्यार्थ्यासोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना
– ५० टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार
– हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार