धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. त्यामुळे तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्याच्या घडीला तालुक्यात फक्त एकच संक्रमित रुग्ण आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.
धरणगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत नाहीय. तालुक्यात एकूण २११३ कोरोनाचे रूग्ण झाले असून यापैकी ४९ रूग्ण मयत झाले. तर २०६३ रूग्ण बरे झाले असून उर्वरित अवघ्या एक रूग्ण उपचार घेत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे. प्रशासन प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. फक्त नागरिकांनी नियमांचे पालन करावे, आपण कोरोनाला लवकरच संपूर्णपणे पराभूत करू, असेही श्री. चौधरी म्हणाले.