लातूर (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच येथील शाळेच्या वसतिगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात सुमारे ४२० विद्यार्थी राहतात. लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.