जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला होता. हा जनता कर्फ्यू काल मध्यरात्री संपला. मात्र याआधीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सायंकाळी नवीन निर्बंध लागू करण्याचे आदेश जाहीर केले असून ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीसाठी आता नवे कडक निबंध लागू केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुण्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीसाठी नवे कडक निबंध लागू केले आहेत. त्यात नाइट कर्फ्यू रात्री १० ते सकाळी सात या वेळेत असेल, तर लग्न घरच्या घरीच २० लोकांच्या उपस्थितीत करण्याचे निर्बंध आहेत, तसेच लग्न सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल, खुल्या सार्वजनिक जागा, लॉन्स यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी सायंकाळी उशिराने हे आदेश जारी केले. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
यांना सशर्त परवानगी
भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. त्यात विक्रेत्यांना एक दिवसाआड एक याप्रमाणे देण्यात यावे, त्याचे नियोजन महापालिका करेल, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सॅनिटायजर, मास्क, हात धुण्याची व्यवस्था, पुरेसे शारीरिक अंतर राखले जावे. याची पाहणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी करावी. भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने सकाळी सात ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू राहतील.
काय राहणार बंद
सर्व आठवडे बाजार, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बगिचे, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, जिम, व्यायामशाळा, खेळांची मैदाने, स्वीमिंग टँक, यात्रा, दिंड्या, उरुस, धार्मिक कार्यक्रम, लॉन्स, मंगल कार्यालये हे सर्व बंद राहणार आहे.
काय राहणार सुरु
जिल्ह्यातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. अभ्यासिका, जिम्स, स्पोर्ट्स, कॉम्पलेक्स, जलतरण तलाव (फक्त राष्ट्रीय व राज्य खेळाडूंसाठी), धार्मिक स्थळे (पाच लोकांच्या उपस्थितीत), खासगी अस्थापना व कार्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व नॉन इसेन्शियल दुकाने मात्र सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल, खानावळी, परमिट रूम, बार सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत, पार्सल सुविधा रात्री १० पर्यंत सुरू असतील. होम डिलिव्हरी रात्री १० वाजेपर्यंत देता येईल. या ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट लागू असेल.
नियम दोडल्यास दंड ; दडाच्या रकमेत वाढ
विनामास्क आढळून येणा या व्यक्तीला ५०० रुपये, थुकणाऱ्यास १ हजार रुपये दंडाची तरतुद आहे. तर गर्दी करणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपये दंड केला जाईल. यात गर्दी करणाऱ्याला आधी ५०० रुपये दंड होता आता तो वाढवण्यात आला आहे.