हरिद्वार (वृत्तसंस्था) देशभर कहर माजवणाऱ्या कोरोनाव्हायरसने आता बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठावरही शिरकाव केला असून हरिद्वारमधील पतंजली योगपीठात ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं, १० एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या कोरोना रुग्णांना पतंजली परिसरात आयसोलेट करण्यात आलं आहे. गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल. बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषधही आणलं होतं. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे औषध खूप फायद्याचं ठरेल, असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध वादातही सापडलं होतं.