धरणगाव (प्रतिनिधी) शहराला लागून असलेल्या हेडगेवार नगर शिवारातून ५ क्विटल कापूस चोरी केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे.
या संदर्भात सुधीर गोकुळ धनगर (वय ३८ वर्ष, धंदा : शेती, रा. धनगर गल्ली), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धर्मा आत्माराम धनगर (वय ३८ वर्ष, धनगर गल्ली, धरणगाव, दिलीप पावरा (पुर्ण नाव माहीती नाही पत्ता माहीत नाही), देवराम पावरा याचा मुलगा (नाव माहीत नाही पत्ता माहीत), यांनी ३० सप्टेंबर रोजीच्या आधी वेळोवेळी आमच्या हेडगेवार नगर शिवारातील शेत गट नं. २२०/२ या शेतातील शेड मधील सुमारे ४० हजार रुपये किंमतीचा ५ क्विटल कापूस चोरून नेला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर चौधरी हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी धर्मा धनगर या संशयितास अटक केली आहे.