अकोला (वृत्तसंस्था) अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशानुसार कलम १५६ (३) नुसार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी क्यांनी सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आज या अर्जावर सुनावणी झाली असून सत्र न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने जामीन अर्जावर निकाल देत पालकमंत्री कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिली. त्यानंतर पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचितने करुन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवेधन पुंडकर यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पालकमंत्री कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

सत्र न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पालकमंत्री कडू यांना नऊ मे पर्यंत तात्पूरता जामीन मंजूर केला. त्यावेळी न्यायालयाने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांना आजच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज अटकपुर्व जामिनावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पालकमंत्री कडू यांना अटकपुर्व जामीन मंजूर केल्याची माहिती मंत्री कडू यांचे वकील ऍड. बी. के. गांधी यांनी दिली.