TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलावर गुन्हा नोंदविण्याचा कोर्टाचा बार्शी पोलिसांना आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) बार्शी शहरातील ढगे मळा येथील शेतकऱ्यांच्या नावावर कागदपत्रे तयार करून बँकेकडून परस्पर ३ लाख रुपये कर्ज उचलल्याप्रकरणी माढयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांच्यासह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी बार्शी पोलिसांना दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, बार्शी शहरातील ढगे मळा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करुन बँक खाते उघडण्यात आले. त्या खात्यावर ३ लाख रुपये कर्ज मंजूर करून शाखाधिकार्यांनी २८ सप्टेंबर २०१६ रोजी रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या बँक खात्यावर रक्कम परस्पर वर्ग केली. या कर्जप्रकरणाबाबत श्रीहरी शिंदे यांना कोणतीही कल्पना नव्हती. बँकेने मुंबईचे अॅड. योगीराज पुरवंत यांच्यामार्फत रक्कम व त्यावरील व्याज अशी ३ लाख ९३ हजार २०३ रक्कम भरण्याची नोटीस शिंदे यांना पाठवली. तेव्हा ही घटना उघडकीस आली. या कर्जप्रकरणाबाबत शिंदे यांनी रणजितसिंह शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता १८ फेब्रुवारी २०२० रोजी पत्र देऊन थकीत रक्कम आठ दिवसांत भरण्याचे कबूल केले होते. मात्र, अद्यापपर्यंत कर्जाची रक्कम भरलेली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. श्रीहरी शिंदे यांच्या दोन मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी पैशाची आवश्यकता असताना, केवळ या थकीत कर्जामुळे आगळगाव येथील बँकेकडून कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, बार्शी शहर पोलिस यांच्याकडे फसवणुकीची तक्रारही दाखल केली. पण, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून न्यायालयात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे (अध्यक्ष, बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीज तुर्कपिंपरी, ता. बार्शी), कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, शाखाधिकारी (बँक ऑफ इंडिया, शाखा ढगे मळा, बार्शी) व अन्य एक अशा चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश बार्शी न्यायालयाने दिला. शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे (रा. बाभूळगाव) यांनी या प्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. श्रीहरी शिंदे यांच्या वतीने अॅड. आर. यू. वैद्य, अॅड के. पी. राऊत यांनी काम पाहिले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : धनादेश अनादरप्रकरणी डॉ. शीतल ओसवाल यांना एक वर्षाची शिक्षा !

August 18, 2023

भुसावळात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या !

October 26, 2020

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 13 नोव्हेंबर 2025 !

November 13, 2025

सुब्रोतो फुटबॉल चषक : १४ वर्षा आतील मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन उप विजयी !

August 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group