जळगाव (प्रतिनिधी) गोरा, बैल (गोवंश) असे २५ गोवंश जातीचे जनावरे निर्दयपणे ट्रकमध्ये कोंबुन कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. याबाबत माहिती मिळताच म्हसावद येथील गोरक्षकांनी कंटेनर ट्रक गावातील मरीमाता मंदिराजवळ पकडला. ट्रकसह सुमारे १८ लाख चार हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोवंश जणावरांची सुटका केली. याप्रकरणी मध्यप्रदेशातील दोघांना ताब्यात घेतले.
कत्तल करण्याच्या उद्देशाने संशयितांनी तब्बल २५ गोरा, बैल (गोवंश) निर्दय व कुरतेने ट्रकमध्ये कोंबले होते. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते निघाले. म्हसावद गावातील मरीमाता मंदिराजवळुन जात असताना गोरक्षकांच्या सतर्कतेतून हा प्रकार उघडकीस आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी व्यावसायिक गुलाब उमर मथारीया (वय २९) तसेच चालक रज्जब युसूफ गोता (वय २५, दोन्ही रा. ग्राम मुलतापुरा जि.मदसोर, म.प्र) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले. हवालदार किरण पाटील तपास करीत आहेत.
















