TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रिकेट संघटनेने कारभाराची माहिती सादर करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसणार : अनिल वाल्हेकर

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील जिल्हा व इतर क्रिकेट संघटनांचे शिखर संघटन असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत काही पदाधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. या संघटनेची सध्या अस्तित्वात असलेली कार्यकारिणी सुद्धा संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार नाही. धर्मदाय आयुक्तांकडे दाखल तक्रारीनुसार या संघटनेची चौकशी करावी, स्वतःच्या स्वार्थासाठी संघटनेत मनमानी करणाऱ्यांवर फौजदारी कलमान्वये गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी क्रिकेटचे माजी खेळाडू व जाणकार अनिल वाल्हेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

या मागणी नंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने धर्मदाय आयुक्त आणि माध्यमांच्यासमोर कारभाराची माहिती दि. १९ डिसेंबरपर्यंत सादर करावी. अन्यथा दि. २० डिसेंबरपासून पुण्यातील नेहरू स्टेडियमसमोर बेमुदत उपोषणाला बसणार असा इशारा वाल्हेकर यांनी यावेळी दिला. बीसीसीआयशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील पदाधिकाऱ्यांचा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. कार्यकारिणीची मुदत संपूनही येनकेन प्रकारे पदावर ताबा घेऊन बसलेल्या मोजक्या व्यक्तींच्या विरोधात राज्यातील काही माजी क्रिकेटपटू एकत्र आले आहेत. संघटनेतील संबंधितांच्या विरोधात उपोषणाच्या माध्यमातून जनआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रारंभ दि. २० डिसेंबरला होईल.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत मनमानी कशाप्रकारे सुरू आहे याची काही उदाहरणे पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. त्यानुसार संघटनेची सध्याची कार्यकारिणी ही संघटनेच्या घटनेनुसार नाही. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कारभारासाठी एक समिती नियुक्त केली आहे. या सर्वोच्च समितीने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सन २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी निवडणूक रद्दबातल ठरवली आहे. एवढेच नव्हेतर बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा मताधिकारही काढून घेतला आहे. या कार्यवाहीवर शिक्का मोर्तब झालेला आहे. याच दरम्यान बीसीसीआयने संलग्न संघटनांच्या नियमात बदल केले आहे. त्या नियमानुसारही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे काम सुरू नाही. बीसीसीआय दाद देत नाही हे पाहून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील मोजक्या मंडाळींनी पदाधिकारी बदलाचा ‘चेंज रिपोर्ट’ धर्मदाय आयुक्तांकडे सादर करण्याची चलाखी केली आहे. सध्याची कार्यकारिणी ही घटनेनुसार निवडल्याचा देखावा केला जात आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीचा अजून दुसरा प्रकार म्हणजे संघटनेची निवडणूक झाली असा देखावा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सध्याचे पदाधिकारी करीत होते. हा प्रकार नियमबाह्य असल्याचे पाहून क्लब ऑफ महाराष्ट्र, पूना क्लब आणि जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना व इतर जिल्हा संघटनाही या निवड प्रक्रियेपासून लांब राहिल्या. एवढेच नव्हे तर या तीनही संघटनांचे काम बंद पाडण्याचा घाठ घातला जात आहे. याविषयी धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी झालेली असून महाराष्ट्र क्रिकेट संघटन तेथे तोंडघशी पडली आहे. धर्मदाय आयुक्तांनी क्लब ऑफ महाराष्ट्र, पूना क्लब आणि जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना यांचे अर्ज मान्य करून त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी लेखी मत मांडण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत सध्या पदाधिकारी असलेले काही सदस्य आता पदावर राहू शकत नाही. बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संघटनेच्या कार्यकारिणीत ९ वर्षे पूर्ण झालेला कोणताही सदस्य पुन्हा पदावर राहू शकत नाही. मात्र आता कार्यरत कार्यकारिणीत मुदत पूर्ण झालेले काही सदस्य पद बळकावून बसले आहेत. अशा प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी काही पदाधिकारी मनमानी करीत असून काही तरी लपविण्यासाठी हे कृत्य करीत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे तीन वर्षांपासूनचे लेखा अहवाल सादर नाहीत. त्यामुळे लेखा परिक्षणही नाही. सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी काम करीत सर्वोच्च न्यायलय, उच्च न्यायालय व धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशांचा अवमान केला आहे.

पत्रकार परिषदेत आज करीत असलेल्या आरोपाबाबत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या तथाकथित पदाधिकाऱ्यांनी ८ दिवसात (दि. १९ पर्यंत) धर्मदाय आयुक्त व माध्यमांच्यासमोर खुलासा द्यावा. अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार असून दि. २० डिसेंबरपासून नेहरु स्टेडियम येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहोत, असेही वाल्हेकर म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

म्हाडाची परीक्षा रद्द ; पेपर लीक करण्याचा प्रयत्न, पुणे सायबर पोलिसांनी तिघा जणांना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीस पळविले ; भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल !

October 26, 2022

नांदेड येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दिपक भोई यांचा सत्कार !

January 6, 2023

जलसंवर्धनासाठी तरुणाई घेणार पुढाकार !

February 22, 2021

राज्यात मान्सून कधी धडकणार? ; जाणून घ्या..पुणे वेधशाळेने काय वर्तवला अंदाज?

May 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group