जळगाव (प्रतिनिधी) कृषि विधेयक रद्द करण्यासह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह आंदोलनात सहभागी २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ नोव्हेंबर ते दुपारी १ वाजेपासून ते ६ नोव्हेंबर दुपारी १ वाजेपर्यंत आकाशवाणी ते स्वातंत्र्य चौकापर्यंत सार्वजिनक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडविणे. तसचे कोरोना पार्श्वभूमिवर जमाव बंदीचे आदेश असतांनाही अनावश्यक गर्दी जमवून जिल्हाधिकार्यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कार्डिले, तारांचद बारेला, अतुल गायकवाड, केशव वाघ यांच्यासह १५० ते २०० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भाग ५ गुरनं १२९/२०२० भादंवि कलम ३४१, १४३, १८८ साथरोग प्रतिबंध कायदा कलम २, ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) चे उल्लंघन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधव धरणे आंदोलनाला बसले होते. या आंदोलनाला आदिवासी मंत्री के.सी.पाडवी यांनी शुक्रवारी भेट देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात होते.
















