कासोदा (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील बाह्मणे येथील साईदुध उत्पादक सोसायटीत एक लाख ८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात गोविंदा रामदास पाटील (वय ६२, बाम्हणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास सदाशिव पाटील हे साईदुध उत्पादक सोसटीच्या सचिव पदावर असतांनी त्या पदाचा दुरउपयोग केला. इतर सोसायटीच्या सदस्यांना पूर्व कल्पना न देता गोविंदा पाटील यांच्या नावाचा ठराव असताना कुणालाही न विचारता भांगचंद मोतिलाला जैन यांच्या नावाने परस्पर विभागीय नाशिक यांच्याकडे ठराव पाठवला. तसेच मध्यवर्ती बँक जि जळगाव शाखा निपाणे यांच्याकडे धनादेश क्र. ००१२२२ खाते क्र.८१२२२५२००११ वर गोविंदा पाटील यांची बनावट खोटी स्वाक्षरी करुन एक लाख आठ हजार रुपये काढून संस्थेची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका समाधान सिंहले हे करीत आहेत.